
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘राष्ट्रीय सुरक्षा अकादमी प्रवेश परीक्षा’ जाहीर
राष्ट्रीय सुरक्षा अकादमी ३६० आणि नावल अकादमी ५५ असे एकूण ४१५ विद्यार्थ्यांना अकादमीतील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी बारावी पास किंवा १०+२ उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सर्व उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)