
उज्वल निकम यांचा एक दिवस कोर्टात उभं राहण्याचा खर्च (मानधन) किमान ५० हजार
प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम यांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी किती मानधन मिळते, हे आता समोर आले आहे. निकम यांची तळेगाव दाभाडे येथील २०१६ मधील खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली असून या खटल्याच्या सुनावणीसाठी निकम यांना प्रतिदिन ५० हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. याशिवाय विचारविनिमय शुल्क, हॉटेल लॉजिंग बोर्डिंग आणि प्रवास खर्चासाठी अतिरिक्त पैसे दिले जाणार आहेत. संपूर्ण बातमी वाचा . . .