चालक-वाहकांना सेवा बजावताना यापुढे बस मध्ये तंबाकू खाण्यास बंदी

NMK-2018-News-Tobacco-chewing-will-be-Disciplined-in-MSRTC

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा बजावताना यापुढे चालक वाहक व मंडळाच्या कर्मचाऱ्यांना तंबाखूची गोळी, पानसुपारी-तंबाखूचा तोबरा तोंडात भरून बोलण्याचा प्रयत्न करणे हे एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शिस्तभंगाच्या कारवाईचे आमंत्रण ठरेल. यापद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करणारे एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील सर्व आगार, कार्यालयांना दिले आहेत.

एसटीत चालक, कंडक्टर वर्गाकडून पान, तंबाखू, सुपारीचे मोठ्या प्रमाणात सेवन होते. त्याचे प्रत्यंतर एसटीच्या गाड्यांप्रमाणेच कार्यालयीन इमारती, आवारातही पिचकाऱ्यांच्या रूपाने प्रत्ययास येते. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होतानाच रोगराई पसरण्याचीही भीती असते. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी तंबाखूचे सेवन न करण्याचे आवाहन यापूर्वी वारंवार केले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महामंडळाने नवीन आदेश काढले आहेत. या परिपत्रकात पान, तंबाखूचे सेवन करून महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह संचालक मंडळ वा अन्य वरिष्ठ स्तरावर चर्चा करण्यास जाऊ नये, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी जोड दिली आहे. (सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स)

.
Comments
Loading...