आधार क्रमांक ऑनलाइन शेअर करताना खबरदारी घेण्याचे यूआयडीएआयचे आवाहन

कुठल्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची ऑनलाइन माहिती देताना आवश्यक ती खबदारी घ्या असे आवाहन यूआयडीएआयने शनिवारी केले. ‘मेरा आधार, मेरी पहचान’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही व्यक्तिंच्या आधारकार्डांचे तपशील समोर आले आहेत त्यावर यूआयडीएआयने याचा आधार कार्डाच्या सुरक्षेशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिक अनेकदा आधारसह अन्य व्यक्तिगत माहिती इंटरनेटवर देत असतात त्यावेळी नागरिकांनी अशी माहिती देताना काळजी घेतली पाहिजे असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले आहे.

आधार कार्डाची सुरक्षा प्रणाली अत्यंत मजबूत असून आमच्या डाटा बेसमधून कोणतीही माहिती लीक झालेली नाही असे यूआयडीएआयने म्हटले आहे. जसे एखादे अन्य ओळखपत्र असते तसेच आधार कार्ड आहे. ते काही गोपनीय कागदपत्र नाही. एखाद्याच्या आधार कार्डाबद्दल तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही त्या व्यक्तिची जागा घेऊ शकत नाही. बायोमेट्रीक प्रणालीनेच तुमची ओळख पटवली जाईल असे यूआयडीएआयने सांगितले.

कोणी तुमच्या परवानगीशिवाय तुमची व्यक्तिगत माहिती आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, बँक खाते, फोटो प्रसिद्ध केले तर तुम्ही त्याविरोधात खटला दाखल करु शकता असे यूआयडीएआयने म्हटले आहे. काही वेबसाइटसवर आधार कार्डाची व्यक्तिगत माहिती उपलब्ध असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत म्हणून यूआयडीएआयने हे स्पष्टीकरण दिले.

‘mera aadhaar meri pehchan filetype:pdf’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही जणांचे आधार तपशील दिसत आहेत. यात आधार धारकाचं नाव, आधार क्रमांक, पालकांचं नाव, पत्ता, जन्म तारीख, छायाचित्र हे तपशील उपलब्ध आहेत. सुदैवानं या कार्डधारकांचे बायोमेट्रीक्स डिटेल्स उपलब्ध नसल्यानं ही तितकी चिंतेची बाब नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. (सौजन्य: लोकसत्ता)

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online