
भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१३ जागा
भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभाग (SECR) यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदाच्या एकूण ४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदाच्या एकूण ४१३ जागा
फिटर- १५६, वेल्डर- ९७, टर्नर- २३, कारपेंटर- २३, इलेक्ट्रिशिअन- ७१, स्टेनोग्राफर & सेक्रेटेरियल असिस्टंट (इंग्रजी/ हिंदी)- ४, कोपा- ८, पेंटर- ३, ऑफिस असिस्टंट कम कॉम्पुटर ऑपरेटर- ५, आरोग्य स्वच्छता निरीक्षक- ३, मशिनिस्ट ५, इलेक्ट्रिशिअन ९, मॅकेनिक मोटर ३, टर्नर पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ऑगस्ट २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे.( अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
फीस – नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ सप्टेंबर २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदाच्या ३९४ जागा