‘पानी फाऊंडेशन’च्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ची घोषणा झाली

मुंबई : ‘पानी फाऊंडेशन’च्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आमीर खानची पत्नी, दिग्दर्शिका किरण राव आणि ‘पानी फाऊंडेशन’च्या सत्यजीत भटकळ यांनी केली.

या कार्यक्रमावेळी ‘पानी फाऊंडेशन’च्या जलमित्र या नवीन उपक्रमाचीही घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘पानी फाऊंडेशन’च्या नवीन संकेतस्थळाची सुरुवात करण्यात आली.

8 एप्रिलला ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ सुरु होणार आहे. हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे. वॉटर कप स्पर्धेमध्ये यावेळी 24 जिल्ह्यांतील 75 तालुके आणि 5 हजार 900 गावं सहभागी होणार आहेत. 31 मार्चपासून पानी फाऊंडेशनचा ‘तुफान आलंया’ हा कार्यक्रमही ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरु होणार असल्याची घोषणा किरण राव यांनी केली.

राज्यात सर्वोत्तम तीन गावांमध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांना अनुक्रमे 75 लाख रुपये, 50 लाख रुपये आणि 40 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्तप्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम गावाला 10 लाखांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 2016 व 2017 या दोन्ही वर्षांतील सत्यमेव जयते वॉटर कप उपक्रमांतून एकूण 10 हजार कोटी लीटर पाण्याची साठवणूक करण्यात आली.

‘जलमित्र’ या उपक्रमात कोणाला सहभागी व्हायचं असेल तर jalmitra.paanifoundation.in या वेबसाईटवर फॉर्म भरावा लागेल. ज्यामध्ये तुम्ही पानी फाऊंडेशनचे स्वयंसेवक होऊ शकता. तर पानी फाऊंडेशन विषयी माहिती हवी असेल तर www.paanifoundation.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. (सौजन्य: एबीपी माझा.)

You might also like
.
Comments
Loading...