
भारतीय रेल्वे सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर सब इन्स्पेक्टर पदाच्या एकूण ११२० जागा
भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांच्या आस्थापनेवरील सब इन्स्पेक्टर पदाच्या पुरुष उमेदवारांमधून ८१९ आणि महिला उमेदवारांमधून ३०१ अशा एकूण ११२० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सब इन्स्पेक्टर पदाच्या एकूण ११२० जागा
पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पास असावा.
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्ष (अनुसूचित जाती/ जमातीसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- आणि अनुसूचित जाती-जमाती/ महिला/ माजी सैनिक उमेदवारांसाठी २५०/- राहील.
परीक्षा – सप्टेंबर/ ऑक्टोबर २०१८ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १ जून २०१८ पासून
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– ३० जून २०१८ पर्यंत आहे.
अधिक माहिती करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी.