
भारतीय रेल्वे सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ८६१९ जागा
भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदाच्या पुरुष उमेदवारांमधून ४४०३ आणि महिला उमेदवारांमधून ४२१६ अशा एकूण ८६१९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 8619 जागा
पात्रता – दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्ष (अनुसूचित जाती/ जमातीसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- आणि अनुसूचित जाती-जमाती/ महिला/ माजी सैनिक उमेदवारांसाठी २५०/- राहील.
परीक्षा – सप्टेंबर/ ऑक्टोबर २०१८ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १ जून २०१८ पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०१८ पर्यंत आहे.
अधिक माहिती करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत