
परभणी येथे १२ मार्च रोजी कौशल्य विकास व भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या वतीने ४६० बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवार दिनांक १२ मार्च २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी’ येथे सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२४५२-२२००७४ वर संपर्क साधावा.
(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)