अमरावती येथे विविध पदांच्या १००० जागा भरण्यासाठी महारोजगार मेळावा

सहाय्यक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय कार्यालय आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने १००० बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘विद्यार्थी भवन, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती’ येथे सकाळी ९:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२१-२६६२३०६ वर संपर्क साधावा. (जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...