
पुणे राज्य राखीव पोलीस बल (१) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई’ पदांच्या ८० जागा
राज्य राखीव पोलीस बल, पुणे गट क्रमांक (१) यांच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदाच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी बारावी पास खुल्या प्रवर्गातील १८ ते २८ तसेच मागास प्रवर्गातील १८ ते ३३ वर्ष वयोगटातील उमेदवारांकडून ६ फेब्रुवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सर्वसाधारण उमेदवारांकरिता ३७५/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२५/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)