लोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा- २०१८ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा- २०१८ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

सहायक कक्ष अधिकारी (सामान्य प्रशासन) एकूण १२६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

राज्य कर निरीक्षक (वित्त विभाग) एकूण ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा – १ मे २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

पोलीस उप निरीक्षक (गृह विभाग) एकूण ३८७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १९ ते ३१ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा फीस – खुल्या वर्गांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३२४/- रुपये राहील.

परीक्षा – सामाईक परीक्षा रविवार दिनांक २६ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात येईल तर दुसरा पेपर स्वतंत्र रविवार दिनांक २, ३० सप्टेंबर २०१८, शनिवार दिनांक ६ आक्टोबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जुलै २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online