खुशखबर ! महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त

NMK-2018-News- petrol-diesel-rates-down

महाराष्ट्रात पेट्रोल प्रतिलिटर पाच आणि डिझेल प्रतिलिटर अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं आहे. नवे दर तात्काळ लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून इंधनाचे दर कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलमध्ये अडीच रुपयांची कपात केली असून, डिझेलच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे डिझेल प्रतिलिटर फक्त अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत अडीच रुपयांची कपात केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली. यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल प्रतिलिटर पाच रुपये आणि डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे. (सौजन्य: लोकसत्ता)

.
Comments
Loading...