
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२० जागा
Zilha Parishad Osmanabad : Various Vacancies 320 Posts
उस्मानाबाद जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
औषध निर्माता पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
आरोग्य सेवक पदांच्या ११३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)
आरोग्य सेविका पदांच्या १३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.
विस्तार अधिकारी (कृषी) पदाची ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
पशुधन पर्यवेक्षक पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक ३ वर्ष अनुभव धारक असावा.
पर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
कनिष्ठ लेखाधिकारी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून
पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०१९ आहे.
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.