केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंदीय आरोग्य सेवा विभागात ९६५ जागा

UPSC Recruitment 2019 : Combined Medical Services Exam-2019

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागातील आरोग्य सेवा विभागातील विविध पदांच्या ९६५ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०१९
रेल्वेतील सहाय्यक विभागीय अधिकारी पदाच्या ३०० जागा, ऑर्डनन्स कारखान्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या ४६ जागा, केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये (कनिष्ठ) पदांच्या २५० जागा, नवी दिल्ली नगरपरिषदेतील वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७ जागा, पूर्वी/ उत्तर दिल्ली/ दक्षिण दिल्ली महानगरपालिकेतील (वर्ग-२) पदाच्या ३६२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमएमबीएस वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आणि नुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मे २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या नवीन संकेतस्थळाला भेट द्या !!!

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online