हैदराबाद येथील सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदाच्या ३८ जागा

SPMCIL Recruitment 2019 : Various Vacancies 38 Posts

भारत सरकारच्या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुपरवायजर (रिसोर्स मॅनेजमेंट) पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.कॉम/ टॅक्सेशन लॉ मधील डिप्लोमा/ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन पदवी/ प्रथम श्रेणी पदवीसह HR संबंधित क्षेत्रात डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी सह आयटीआय (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर टेक्निशिअन (प्रिंटिंग) पदाच्या ३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयटीआय (प्रिंटिंग) उदा. लिथो ऑफसेट मशीन मेन्डर, लेटर प्रेस मशीन मिंडर, ऑफसेट प्रिंटिंग, प्लेटमेकिंग ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. ( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

फायरमन (RM) पदाच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह फायरमन प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्हता धारक असावा. तसेच उमेदवाराची किमान उंची १६५ सेंमी आणि छाती ७९-८८ सेंमी एवढी असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. ( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४१५/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – मार्च/ एप्रिल २०१९ मध्ये घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ फेब्रुवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online