
भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ सहयोगी पदाच्या ८९०४ जागा
SBI Recruitment 2019 : Junior Associate Vacancies 8904 Posts
भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक आणि विक्री) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ सहयोगी (लिपिक) पदाच्या ८९०४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी २० ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १२५/- रुपये आहे.
परीक्षा – जून २०१९ मध्ये पूर्व परीक्षा आणि १० ऑगस्ट २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मे २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.