भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १३४८७ जागा

RRB Recruitment 2018 : Various Vacancies 13487 Posts

रेल्वे भरती बोर्ड मार्फ़त भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, डेपो साहित्य अधीक्षक, रसायन व धातुकाम सहाय्यक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता पदाच्या १२८४४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका/ पदवीधारक असावा.

कनिष्ठ अभियंता (आयटी) पदाच्या २९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पीजीडीसीए/ बी.एस्सी.(संगणक)/ बीसीए/ बी.टेक (आयटी/ संगणकशास्त्र) आणि DOEACC संगणक कोर्स (बी-लेव्हल) पूर्ण केलेला असावा.

डेपो अधीक्षक (साहित्य) पदाच्या २२७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदविका/ पदवीधारक असावा.

रसायन व धातुकाम सहाय्यक पदाच्या ३८७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४५% गुणांसह बी.एस्सी.(भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) उत्तीर्ण असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ ट्रान्झेंडर/ ईबीसी/ अल्पसंख्याक/ माजी सैनिक उमेदवारांना २५०/-रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online