महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अभियंता पदाच्या एकूण ४०१ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी अभियंता पदाच्या एकूण ४०१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी अभियंता (पदवीधर) पदाच्या ६३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बीटेक (इलेक्ट्रिकल) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

प्रशिक्षणार्थी अभियंता (डिप्लोमा) पदाच्या ३३८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही असेल.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५०/- रुपये आहे.

परीक्षा – ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ सप्टेंबर २०१८ (सायंकाळी ५:३० पर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

नाशिक येथे विविध पदांच्या ८८६ जागा भरण्यासाठी बुधवारी रोजगार मेळावा

स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण ५४९५३ जागा (मुदतवाढ)

You might also like
.
Comments
Loading...