
पालघर आदिवासी विकास विभागात ‘क्रीडा मार्गदर्शक’ पदांच्या एकूण ६४ जागा
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प, जव्हार व डहाणू, जि.पालघर यांच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळेतील क्रीडा शिक्षक पदाच्या एकूण ६४ जागा निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कंत्राटी क्रीडा मार्गदर्शक पदाच्या ६४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि किमान विद्यापीठ स्तरावरील मैदानी स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले खेळाडू असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे ४२ वर्ष पर्यंत असावे. (माजी सैनिक/ निवृत्त पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी असणाऱ्या उमेदवारांना ४५ पर्यंत सवलत.)
नोकरीचे ठिकाण – पालघर जिल्ह्यात कुठेही
परीक्षा फीस – ३००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
इंडियन बँक यांच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ४१७ जागा