
जळगाव जिल्ह्यातील विविध उपविभागात कोतवाल पदाच्या १९८ जागा
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील कोतवाल पदाच्या एकूण १९८ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कोतवाल पदाच्या एकूण १९८ जागा
पाचोरा उपविभाग २४ जागा, एरंडोल उपविभाग ३७ जागा, फैजपूर उपविभाग ३७ जागा, चाळीसगांव उपविभाग २० जागा, अंमळनेर उपविभाग २२ जागा, भुसावळ उपविभाग १५ जागा आणि जळगाव उपविभाग ४३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४ थी उत्तीर्ण आणि स्थानिक रहिवासी असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २४ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण ५४९५३ जागा (मुदतवाढ)