
डोंबिवली नागरी सहकारी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ५२ जागा
डोंबिवली नागरी सहकारी बँक यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) पदाच्या ५२ जागा
शैक्षणिक पात्रता – कला/ विज्ञान/ वाणिज्य/ कृषि/ व्यवस्थापन पदवी आणि संगणक प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१८ रोजी २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती/ इतर मागासवर्गीय/ मागासवर्गीय/ एनटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गतील उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती-जमाती/ इतर मागासवर्गीय/ मागासवर्गीय/ एनटी प्रवर्गातील उमेदवारांना ५००/- रुपये आहे.
परीक्षा – ऑक्टोबर २०१८ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) संस्थेत एकूण ४९४ जागा (मुदतवाढ)