तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदाच्या एकूण १०७ जागा

ONGC Recruitment 2019 : Executive Officer's 107 Posts

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध कार्यकारी अधिकारी पदाच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदाच्या ४२ जागा
शैक्षिणक पात्रता – उमेदवार एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.

सुरक्षा अधिकारी पदाच्या २४ जागा
शैक्षिणक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधारक आणि CPO/ CAPF मध्ये २ वर्ष अनुभवधारक असावा.

वित्त व लेखा अधिकारी पदाच्या ३१ जागा
शैक्षिणक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह पदवीधर आणि ICWA/ CA/MBA (Finance) किंवा PGDM अर्हता धारक असावा.

प्रगत अभियांत्रिकी पर्यावरण पदाच्या २ जागा
शैक्षिणक पात्रता – उमेवार बी.ई./ एम.टेक/ एम.ई. (पर्यावरण/ पर्यावरण विज्ञान) अर्हता धारक असावा.

अग्निशमन अधिकारी पदाच्या ९ जागा
शैक्षिणक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह अभियांत्रिकी (अग्निशमन) पदवीधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ जून २०१९ रोजी ३० वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३७०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा – जुलै २०१९ मध्ये संगणक आधारित परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जून २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online