राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक तथा वाहक पदाच्या ४४१६ जागा

MSRTC Recruitment 2019 : Driver com Conductor's 4416 Posts

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर विभागाच्या आस्थापनेवरील चालक तथा वाहक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

चालक तथा वाहक पदाच्या एकूण ४४१६ जागा
औरंगाबाद विभाग २४० जागा, जालना विभाग २२६ जागा, परभणी विभाग २०३ जागा, अमरावती विभाग २३० जागा, अकोला विभाग ३३ जागा, बुलढाणा विभाग ४७२ जागा, यवतमाळ विभाग १७१ जागा, धुळे विभाग २६८ जागा, जळगाव विभाग २२३ जागा, नाशिक विभाग ११२ जागा, पुणे विभाग १६४७ जागा आणि सोलापूर विभाग ५९१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) यांचेकडील अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना व पी.एस.व्ही.बॅज (बिल्ला) असणे आवश्यक असून वाचकाचा वैध परवाना व बॅज (बिल्ला) नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील. तसेच सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील (ट्रक, प्रवासी बस) चालविण्याचा किमान ३ वर्ष विना अपघात अनुभव असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता – उमेदवाराची उंची किमान १६० सेंमी व कमाल १८० सेंमी असणे आवश्यक असून दृष्टी चष्म्याविना ६ x ६ (चष्मा न लावता पाहता येणे) आवश्यक आहे. तसेच रंगआंधळेपणा/ रातआंधळेपणा हा दोष असलेले उमेदवार अपात्र असतील.

वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय १४ जानेवारी २०१९ रोजी २४ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

आरक्षण – शासन परिपत्रकानुसार महिलांना ३० टक्के, माजी सैनिकांना १५ टक्के, भूकंपग्रस्त २ टक्के, प्रकल्पग्रस्त ५ टक्के, खेळाडू ५ टक्के, अंशकालीन कर्मचारी १० टक्के आणि अनाथ मुलांकरिता १ टक्का आरक्षण देय राहील. तसेच केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या १० टक्के आरक्षणा संदर्भात राज्य शासन जे आदेश निर्गमित करील ते प्रस्तुत प्रकरणी लागू राहील.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये तसेच मागास प्रवर्गातील उमेदवार आणि महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त भागातील उमेदवारांना ३००/- रुपये (बँक चार्जेस शिवाय) आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ जानेवारी २०१९ पासून …

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत …

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online