
रिक्त पदांच्या मेगाभरतीसाठी लवकरच जाहिराती येणाची शक्यता
Megha Bharti 2018 : Zilha Parishad Bharti 2018
मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याने राज्य सरकारने स्थगित केलेली मेगाभरती लवकरच सुरु होत असून यामध्ये सर्वच्या सर्व एकूण ७२ हजार रिक्त एकदाच भरण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती कार्यवाही सुरु झाली असून पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून फेब्रुवारी २०१९ मध्ये एकाचवेळी सामाईक परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव डी.के.जैन यांनी दिली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या अस्थापानेवरील रिक्त असलेल्या पदांचा संवर्गीय तपशील आणि अभ्यासक्रम ५ डिसेंबर २०१८ पूर्वी नव्याने पाठविण्याबाबत आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना निर्गमित झाले आहेत.
कृपया अधिकृत NMK करिता NMK.CO.IN असे सर्च करा