आयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवर कंत्राटी कार्यकारी पदाच्या ३०० जागा

IDBI Recruitment 2019 : Executive Vacancies 300 Posts

आयडीबीआय बँक यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदाच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यकारी (एक्झिक्युटिव) पदाच्या ३०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी धारण केलेली असावी. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ४५% गुण आवश्यक आहेत.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी २१ ते २५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गासाठी १५०/- रुपये आहे.
परीक्षा – १६ मे २०१९ रोजी ऑनलाईन चाचणी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या नवीन संकेतस्थळाला एकदा अवश्य भेट द्या !!!

You might also like
.
Comments
Loading...