
आयडीबीआय बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ५०० जागा
IDBI Recruitment 2019 : Assistant Manager 500 Posts
आयडीबीआय बँक यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या ५०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह पदवी धारण केलेली असावी. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५५% गुण आवश्यक आहेत.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी २१ ते २८ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गासाठी १५०/- रुपये आहे.
परीक्षा – १७ मे २०१९ रोजी ऑनलाईन चाचणी परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.