गडचिरोली भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा मध्ये विविध पदाच्या १५ जागा

GSDA Recruitment 2018 : Various Vacancies for the 15 Posts

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

रसायनी पदाच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी.(रसायनशास्त्र) आणि MS-CIT उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

अणुजैविक तज्ञ पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी.(सुक्ष्मजीवशास्त्र) आणि MS-CIT उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्ण (विज्ञान) असावा. (पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

प्रयोगशाळा मदतनीस पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली

परीक्षा फीस – नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, प्रशासकीय इमारत, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर, बॅरेक क्रमांक- २, कॉम्प्लेक्स, गडचिरोली, पिनकोड: ४४२ ६०५

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर २०१८ ( सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना पहा

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online