कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या एकूण १५९ जागा

ESIC Recruitment 2018 : Various 159 Posts

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या १५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

दंतवैद्यक (स्वच्छता) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. पदवीसह डेंटल हाइजीनिस्ट डिप्लोमा आणि २ वर्षे अनुभव आवश्यक आहे.

ईसीजी तंत्रज्ञ पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. पदवी आणि १ वर्ष अनुभव किंवा बारावी उत्तीर्ण आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्णसह डी.एम.एल.टी. डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सहाय्यक (शस्त्रक्रिया विभाग) पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्णसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

व्यावसायिक थेरपिस्ट पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्णसह व्यावसायिक थेरपिस्ट पदवी/ डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक आहे.

फार्मासिस्ट पदाच्या ३५ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.फार्म पदवी/ डी.फार्म पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

फिजिओथेरेपिस्ट पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्णसह फिजिओथेरेपिस्ट पदवी/ डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

स्टाफ नर्स पदाच्या १०२ जागा
शैक्षणिक पात्रता – जनरल नर्सिंग & मिडवाइफ डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारणसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online