
केंद्रीय राखीव पोलीस दलात चिकित्सक पदांच्या एकूण ९२ जागा
CRPF Recruitment 2019 : Various Doctor's 92 Posts
भारत सरकारच्या संरक्षण खात्यांतर्गत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, दंत सर्जन आणि सामान्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.
चिकित्सक (डॉक्टर) पदाच्या ९२ जागा
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाच्या ७ जागा, दंत सर्जन पदाची १ जागा आणि सामान्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या ८४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका (पदव्युत्तर पदवीधारकांकरिता एक वर्ष सहा महिने आणि पदविकाधारकांसाठी २ वर्ष ६ महिने अनुभव आवश्यक) किंवा डेंटल सर्जरी पदवीधारक किंवा एम.बी.बी.एस. सह इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० जुलै २०१९ रोजी ६७ वर्षांपर्यंत असावे.
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
फीस– नाही.
थेट मुलाखत – दिनांक ३० व ३१ जुलै २०१९ (सकाळी 9 वाजल्यापासून) घेण्यात येतील.
मुलाखतीचे ठिकाण – कंपोझिट हॉस्पिटल,सीआरपीएफ, बिलासपुर/ रांची/ नागपूर/ मणिपूर/ जम्मू/ श्रीनगर येथे घेण्यात येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
सौजन्य: राजे करिअर अकॅडमी, सांगली.