
कॅनरा बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ८०० जागा
Canara Bank Recruitment 2018 - PO Vacancies for the 800 Posts
मणिपाल विद्यापीठामार्फत एक वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (पीजीडीबीएफ) बँकिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०१८ आहे.
प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ८०० जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (६०% गुणांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५५% आवश्यक)
वायोमार्यदा – उमेदवाराचे वय १ ऑक्टोबर २०१८ रोजी २० ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७०८/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ११८/- रुपये आहे.
परीक्षा – २३ डिसेंबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.