मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर स्वीय सहाय्यक पदाच्या ९९ जागा

मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ यांचे आस्थापनेवरील स्वीय सहाय्यक पदाच्या एकूण १०४ जागांपैकी ९९ जागा भरण्यासाठी निवड यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्वीय सहाय्यक (पीए) पदाच्या एकूण ९९ जागा
मुंबई उच्च न्यायालय- ६८, नागपूर खंडपीठ- २५ आणि औरंगाबाद खंडपीठ- ६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेतील पदवीसह इंग्रजी लघुलेखन (१२० श.प्र.मि) व इंग्रजी टायपिंग (५० श.प्र.मि) वाणिज्य परीक्षा तसेच MS-CIT किंवा समतुल्य कोर्स पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ११ सप्टेंबर २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई, नागपूर, औरंगाबाद

परीक्षा फीस – ३००/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

You might also like
.
Comments
Loading...