बँक ऑफ बडोदा मध्ये विशेष अधिकारी पदाच्या एकूण ९१३ जागा

Bank of Baroda Recruitment 2018 : Specialist Officer Posts

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदाच्या ९१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कायदेतज्ज्ञ पदाच्या एकूण ५० जागा
शैक्षणिक अर्हता – उमेदवार विधी पदवी उत्तीर्ण आणि ५ किंवा ३ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ ते ३५ वर्ष आणि २५ ते ३२ वर्ष दरम्यान असावे.

संपत्ती व्यवस्थापन (विक्री) पदाच्या १५१ जागा
शैक्षणिक अर्हता – उमेदवार मार्केटिंग/ सेल्स/ रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग/ फायनांस डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता आणि ४ किंवा ५ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.

संपत्ती व्यवस्थापन (ऑपरेशन्स) पदाच्या ७०२ जागा
शैक्षणिक अर्हता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि २ वर्ष अनुभव धारक असावा किंवा मार्केटिंग/ सेल्स/ रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग/ फायनांस डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा फीस – खुल्या/ इत्तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ डिसेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online