
राज्य सामाईक (बी.एड.) प्रवेश परीक्षा-२०१९ साठी ऑनलाईन अर्ज करा
MAH-CET-2019 : (MAH-B.Ed-CET-2019) & (MAH-B.Ed-ELCT-2019)
महाराष्ट्र सरकारच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत बी.एड. (नियमित) आणि बी.एड. (विशेष शिक्षण) या दोन वर्ष पूर्ण वेळ नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाकरीता मे-२०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा-२०१९ (MAH-B.Ed-CET-2019) आणि (MAH-B.Ed-ELCT-2019) मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ भटक्या विमुक्त जाती/ भज-अ/ भज-ब/ भज-क/ भज-ड/ इतर मागासवर्गीय/ विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- रुपये आहे.
प्रवेशपत्र – १६ मे २०१९ पासून पासून उपलब्ध होतील.
निकाल – २० जून २०१९ जाहीर करण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.