
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेत ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदाच्या ९२ जागा
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदाच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी २१ ते ३० वर्ष वयोगटातील पदवी किंवा पदव्युत्तर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. खुल्या वर्गांसाठी ८०० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५० रुपये परीक्षा फीस आकारण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०१८ आहे.
(सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)