
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरतीसाठी मुख्य परीक्षा जाहीर
नगरपरिषद प्रशासन संचालनालय मार्फत राज्यातील नगरपालिका-परिषदांच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी, लेखापरीक्षक व लेखा आणि करनिर्धारण व प्रशासकीय सेवा अंतर्गत विविध पदांच्या एकूण १८८९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेत सहभागी होण्यसाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्रता – उमेदवार १८ मे २०१८ रोजी घेण्यात आलेली पूर्व परीक्षा उत्तीर्ण असावा.
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६००/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये राहील.
प्रवेशपत्र – 24 ऑगस्ट २०१८ पासून उपलब्ध होतील.
परीक्षा – 2 सप्टेंबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
सूचना: अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.world टाईप करून सर्च करा …