
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘गट-क’ संवर्गातील विविध पदाच्या एकूण ८६२ जागा
महाराष्ट्र शासनाच्या गट-क संवर्गातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील ‘दुय्यम निरीक्षक’ पदाच्या ३३ जागा, वित्त विभागातील ‘कर सहाय्यक’ पदाच्या ४७८ जागा, सामान्य प्रशासन विभागातील लिपिक-टंकलेखक (मराठी) पदाच्या ३१६ जागा आणि लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) पदाच्या ३५ जागा असे एकूण ८६२ पदे भरण्यासाठी ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१८’ रविवार दिनांक १० जून २०१८ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०१८ आहे.
(सौजन्य: एकलव्य अकॅडमी,नारायण पेठ,पुणे.)