Mission PSI STI ASST 2017

नमस्कार दोस्तहो,

या वर्षी नक्कीच तुम्ही सततच्या परीक्षा देवून दमला असणार, अर्थात ज्यांनी मागील ४ महिन्यात अथक परिश्रम घेवून अभ्यास केलेला असेल त्यांनाच हे लागू ठरेल. या वर्षी MPSC आयोगाने प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याच्या अनेक संधी एका पाठोपाठ आपल्याला दिल्यात. काही Success होतील, काहींनी नक्कीच आपला बेस्ट प्रयत्न दिला असेल, काहींच्या थोड्या चुका झाल्या असतील, काहींचे प्रयत्न कमी पडले असतील.

असो.. छोडो यारो कल कि बाते..

पण तुम्ही पुन्हा नवीन जोमाने आपल्या चुका सुधारून.. कमतरता मागे सारून.. पुन्हा एक प्रयत्न करण्याची हिंमत करणार असाल… तर या वर्षी आणकी एक मोठी संधी तुमच्या समोर आहे…

ती म्हणजे PSI STI ASST Combine Pre Exam 2017 अर्थात – सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी- सामाईक पूर्व परीक्षा २०१७

थोडक्यात जाणून घेऊ काय आहे ही Combine Pre Exam…

1.सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील भरतीकरीता सध्या आयोगाकडून स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्व परीक्षा घेतल्या जातात. या तीनही पूर्व परीक्षांसाठी परीक्षा योजना, अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ एकसमान आहेत. तरीही स्वतंत्र पूर्व परीक्षांमुळे प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे, पूर्व/अभ्यास, प्रवास, निवास, व्यवस्था, रजा घेणे अशा बाबींवर उमेदवारांना स्वतंत्रपणे व पुन्हा पुन्हा वेळ व पैसा खर्च करावा लागतो. निवड प्रक्रियेतही विलंब होतो.

या बाबी टाळण्यसाठी सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांवरील भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

तर हे बदल या वर्षी पासून अर्थात २०१७ पासून लागू होणार आहेत. आणि या नुसार पहिली संयुक्त पूर्व परीक्षा ही जुलै २०१७ मध्ये होईल.

( Click here for latest MPSC Exam Timetable )

आता या तीनही पदांकरीता संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन, अर्ज करणार्‍या उमेदवारांकडून ते या पैकी एक, दोन किंवा तीनही पदांसाठी बसू इच्छितात काय, याबाबत विकल्प घेण्यात येईल. संबंधित पदांकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधित पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल/येतील व त्याच्या आधारे तसेच, भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित पदाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्‍चित करुन, सामाईक पूर्व परीक्षेच्या आधारे तीनही पदांकरीता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील.

त्यानंतर त्या-त्या पदाच्या मुख्य परीक्षेस पात्र ठरणार्‍या उमेदवारांची विद्यमान मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे, स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ अशा इतर बाबींमध्ये कोणताही बदल नाही.

(म्हणजेच पूर्वी स्वतंत्र घेण्यात येणाऱ्या या ३ पूर्व परीक्षा – PSI, STI, ASST. आता संयुक्तपणे घेण्यात येतील अर्थात तीनही पूर्व परीक्षांसाठी Exam Pattern, अभ्यासक्रम, प्रश्‍नसंख्या, गुण, वेळ एकसारख्या असल्या कारणाने हे शक्य आहे.)
2.यानंतर सर्वात महत्वाचे ठरते ते म्हणजे परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) , अभ्यासक्रम (Syllabus)
जाणून घेणे.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online