
अहमदनगर येथे उद्या १९ जून २०१८ रोजी कौशल्य विकास व रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्या वतीने २३१ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार दिनांक १९ जून २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी ‘रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती, समर्थ शाळेसमोर, भिस्तबाग रोड, अहमदनगर’ येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२४१-२४२५५६६ वर संपर्क साधावा.