
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७१ जागा
भारत सरकार अधिनिस्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील पुढील पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ वयक्तिक सहाय्यक पदाच्या १६६ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातील कला/ वाणिज्य/ व्यवस्थापन/ विज्ञान पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण किंवा व्यावसायिक/ सचिवालय कोर्स (प्रथम श्रेणी) उत्तीर्ण आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
स्टेनोग्राफर पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतील स्टेनो टायपिस्ट/ स्टेनोग्राफर (इंग्रजी लघुलेखन ८० प्रति/ मिनिट) सह संगणक ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा – ३० एप्रिल २०१८ रोजी १८ ते २६ वर्षे आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे वयोमर्यादा शिथिल राहील. तसेच माजी सैनिक/ अपंग/ विधवा महिला उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादा लागू राहील.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १० एप्रिल २०१८
परीक्षा फीस – सर्वसाधारण/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आकारण्यात येईल. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ महिला/ अपंग उमेदवारांसाठी फीस नाही.
परीक्षा – १२ ऑगस्ट २०१८ रोजी घेतली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०१८
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.