
नाशिक येथे भारतीय प्रशासकीय सेवा विनामूल्य पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेशपरीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा-२०१९ ची तयारी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे विनामूल्य पूर्वप्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यासाठी रविवार दिनांक ११ नोव्हेंबर २०१८ रोजी नाशिक केंद्रावर सामाईक प्रवेशपरीक्षा आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पूर्वप्रशिक्षण प्रवेशाकरिता उपलब्ध एकूण ७० जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यतापात्र विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१८ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग ५ वर्ष आणि इमाव/ विमाप्र/ विजा/ भज प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांनां ३००/- रुपये तर अज/ अजा/ इमाव/ विमाप्र/ विजा/ भज प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.
प्रवेशपत्र – २६ आक्टोबर २०१८ पासून उपलब्ध होतील.
परीक्षा – ११ नोव्हेंबर २०१८ रोजी केवळ नाशिक केंद्रावर घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ आक्टोबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अमरावती येथे भारतीय प्रशासकीय सेवा विनामूल्य पूर्वप्रशिक्षण प्रवेशपरीक्षा