Dinvishesh : 2 February 2018

जागतिक दिवस

  • जागतिक पाणथळ भूमी दिन

महत्वाच्या घटना

  • १८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.
  • १९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
  • १९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.
  • १९५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
  • १९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
  • १९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
  • १९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.

जन्म

  • १७५४: फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८३८)
  • १८५६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)
  • १८८४: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)
  • १८९७: हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १९७२)
  • १९०५: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च१९८२)
  • १९२२: भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७८)
  • १९२३: केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)
  • १९७९: अभिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९०७: रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)
  • १९१७: लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)
  • १९३०: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १८७१)
  • १९७०: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन. (जन्म: १८ मे १८७२)
  • १९८७: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन. (जन्म: २१ एप्रिल १९२२)
  • २००७: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन. (जन्म: २७ डिसेंबर १९४४)
.
Comments
Loading...