
मुंबई येथील वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात विविध पदांच्या एकूण १४० जागा
न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या २० जागा, वैज्ञानिक सहाय्यक (सायबर) पदाच्या ७३ जागा, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या १० जागा, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या ७ जागा, लिपिक टंकलेखक पदाच्या १२ जागा, प्रयोगशाळा परिचर पदाच्या ९ जागा आणि इतर विविध पदांच्या ९ जागा असे एकूण १४० पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०१८ आहे.
(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)