Current Affairs 3 February 2018

लवकरच सामान्यांच्या सेवेत येणार ‘मोदी केअर योजना’, 50 कोटी लोकांना होणार लाभ :

 • नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी बजेटमध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. शेतकरी आणि सामान्यांच्या फायद्यासाठी ब-याच तरतुदी बजेटमध्ये मांडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अरुण जेटली यांनी ‘मोदी केअर योजना’ही जाहीर केली आहे. जगामधील ही सर्वात मोठी आरोग्य योजना असून, कॅशलेस स्वरुपात ती उपलब्ध होणार असल्याचे सूतोवाचही जेटलींनी केले आहेत.
 • या योजनेंतर्गत बहुतेक खासगी आणि शासकीय रुग्णालयांत रुग्णांना उपचारासाठीच्या खर्चाचा विमा उपलब्ध होणार आहे. या योजनेत सरकारी रुग्णालये आणि काही मोजक्या खासगी रुग्णालयांनाही समाविष्ट करण्यात आलं आहे. यावर सखोल विश्लेषण सुरू असून, त्यासाठी नीती आयोग आणि आरोग्य मंत्रालयामध्ये अनेक चर्चेच्या फे-याही झडल्या आहेत. मोदी केअर योजना येत्या 2018-19 या आर्थिक वर्षात लागू होणार असल्याचेही सांगितले जाते.
 • आठ महिन्यांनंतर ही योजना प्रत्यक्षात सामान्यांच्या सेवेत येणार असून, या योजनेचं लोकार्पण गांधी जयंतीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 2 ऑक्टोबरपासून या योजनेला सुरुवात होणार आहे.
 • राष्ट्रीय स्वास्थ्य संरक्षण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या या मोदी केअर योजनेसाठी गरज पडल्यास निधीची मर्यादाही वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत देशभरातील 40 टक्के लोकसंख्येला म्हणजेच 10 कोटी कुटुंबांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडल्यास 5 लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.(source :Lokmat)

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्य फेरीत :

 • ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. मात्र ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यप, बी. साईप्रणीत व समीर वर्मा यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
 • सिंधूला आठव्या मानांकित कोरॅलीस बोईट्झविरुद्ध २१-१२, १९-२१, २१-११ असा विजय मिळवताना झुंजावे लागले. सिंधूने पहिला गेम जिंकत झकास सुरुवात केली; परंतु दुसऱ्या गेमध्ये ऐन मोक्याच्या क्षणी तिला खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. हा गेम जिंकत स्पेनच्या बोईट्झने सामन्यातील रंगत वाढवली. तिसऱ्या गेममध्ये पुन्हा सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण मिळवत सिंधूने विजय मिळवला. तिची उपांत्य फेरीत तृतीय मानांकित रात्चानोक इन्तानोनशी गाठ पडेल. इन्तानोनने सातव्या मानांकित यिप पुई यिनवर २१-११, २१-११ असा सफाईदार विजय मिळवला.
 • पुरुषांच्या एकेरीत चीनच्या किआओ बिनने कश्यपचा २१-१६, २१-१८ असा पराभव केला. दोन्ही गेम्स चुरशीने खेळले गेले. मात्र महत्त्वाच्या क्षणी बिनने चतुरस्र खेळ करीत वर्चस्व गाजवले. आठव्या मानांकित साईप्रणीतला तृतीय मानांकित चोऊ तिएनचेनने २१-१५, २१-१३ असे सरळ दोन गेम्समध्ये हरवले. समीरला मलेशियाच्या इस्कंदर झुल्कारनैनने २१-१७, २१-१४ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली.
 • दुहेरीत एन. सिक्की रेड्डीला संमिश्र यश मिळाले. मिश्र दुहेरीत तिने प्रणव जेरी चोप्राच्या साथीने चीनच्या हान चेंगकाई व काओ तोंगवोई यांचा २१-८, २१-१३ असा दणदणीत पराभव केला. त्याआधी तिला महिलांच्या दुहेरीत पराभव स्वीकारावा लागला. चीनच्या दुओ येई व ली यिनहुई यांनी सिक्की व अश्विनी पोनप्पा यांची विजयी वाटचाल २१-७, २३-२१ अशी रोखली. दुहेरीच्या अन्य लढतीत जे. मेघना व पूर्विशा राम या भारतीय जोडीला जोंग्कोल्फान कितिथाराकुल व राविंडा प्रजोंगजेई यांनी २१-१०, २१-१५ असे नमवले.(source :abpmajha)

राम मंदिरासाठी अधिका-याची प्रतिज्ञा :

 • लखनौ : अयोध्येमध्ये लवकरात लवकर राममंदिर बांधण्याची प्रतिज्ञा उत्तर प्रदेशमधील होमगार्डचे महासंचालक जनरल सूर्यकुमार शुक्ला यांनी घेतल्याने वादंग निर्माण झाले आहेत. शुक्ला आॅगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत.
 • लखनौ विद्यापीठात आयोजिण्यात दोन दिवसीय कार्यक्रमात अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी उपस्थितांनी शपथ घेतली. त्यात शुक्लाही सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची व्हिडीओ फित सोशल मिडियावर झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
 • शुक्ला यांनी अशा प्रकारच्या जाहीर समारंभात सहभागी होणे व शपथ घेणे टाळायला हवे होते, असे काँग्रेस व समाजवादी पार्टीने म्हटले आहे.(source :Lokmat)

बेरोजगार मराठा तरुणांना आर्थिक मदतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार :

 • मुंबई : राज्य सरकारनं मराठा तरुणांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियानांतर्गत मराठा तरुणांना आर्थिक मदत देणार आहे. यामध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक विकासामार्फत मदत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
 • या निर्णयामुळे प्रामुख्याने बेरोजगार मराठा तरुण आणि शेतीत विविध प्रयोग करणाऱ्यांना तरुणांना संधी मिळणार आहे. याअंतर्गत तीन गटात विभागणी करुन कर्जाच वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 • या अभियानाअंतर्गत तरुणांना व्यवसायाकरीता 10 लाखांचं कर्च मिळणार आहे. तर सामुहिक शेतीसाठी 10 लाखांचं बिनव्याजी कर्ज 7 वर्षांसाठी मिळणार आहे. त्याबरोबर मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.(source :abpmajha)

अर्थसंकल्प २0१८ : ‘विकास पुरुष’ ते ‘गरिबांचा नेता’, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न :

 • नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी २0१४ मध्ये स्वत:ला ‘विकास पुरुष’ म्हणून देशासमोर उभे करून लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. आता त्याच मोदी यांची २0१९ च्या निवडणुकीआधी त्यांना ‘गरिबांचा नेता’ म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पावरून दिसत आहे.
 • राहुल गांधी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष असताना २0१५ मध्ये नरेंद्र मोदींवर ‘सूट-बूट की सरकार’ अशी टीका केली होती. त्यातच बिहारची निवडणूकही भाजपला गमवावी लागली होती, तेव्हापासूनच मोदींनी स्वत:ची गरिबांचा नेता म्हणून प्रतिमा तयार करण्याचे ठरवले, असे जाणवते. तेव्हापासून मोदींनी स्वत:ला मोठ्या उद्योगपतींपासून दूर ठेवले.
 • आगामी निवडणुकीत ‘गरिबांचा नेता’ म्हणूनच मोदी जनतेला सामोरे जाणार आहेत, असे स्पष्ट संकेत वित्तमंत्री जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिले. सूत्रांनी सांगितले की, मोदींनी दिलेले नोकºयांचे आश्वासन २0१९ च्या आत पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे देशाचा मध्यमवर्ग नाराज आहे. शेती संकटात असल्यामुळे ग्रामीण भाग नाराज आहे. या परिस्थितीत ‘गरिबांचे नेता’ अशी प्रतिमा उभी करणे मोदींसाठी आवश्यक होते. ही प्रतिमा तयार करण्यासाठी मोदींनी पाच कलमी कार्यक्रम आखला आहे.
 • त्यातील एक आहे उज्ज्वला योजना, तर दुसरी आहे सौभाग्य योजना. याद्वारे गरिबांच्या घरात गॅस सिलिंडर व वीज जोडणी दिली जात आहे. तिसरी आहे स्वच्छ भारत योजना ज्यात गरिबांना मोफत शौचालय बांधून दिली जातील.
 • चौथी योजना ही शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील गरिबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देते. पाचवी आणि सर्वांत महत्त्वाकांक्षी योजना सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केली. ती म्हणजे आरोग्य संरक्षण योजना. ‘ओबामा केअर’च्या धर्ती हिला ‘मोदी केअर’ म्हटले गेले आहे.(source :Lokmat)

बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या कुलगुरुपदी बी. ए. चोपडे :

 • नवी दिल्ली : बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या कुलगुरुपदी मराठमोळी व्यक्ती विराजमान झाली आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु बी. ए. चोपडे यांची नियुक्ती बीएचयूच्या कुलगुरुपदी करण्यात आली आहे.
 • बी. ए. चोपडे यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेल्या चोपडेंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांना ही संधी मिळाली आहे.(source :abpmajha)
 • गेल्या वर्षी बनारस हिंदू विद्यापीठात तरुणींच्या छेडछाडीचं प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. बीएचयूचे तत्कालीन कुलगुरु प्रा. जी. एस. त्रिपाठी यांना दीर्घकालीन सुट्टीवर पाठवण्यात आल्यामुळे ते पद तूर्तास रिक्त आहे.
 • राष्ट्रपतींनी हे पद भरण्याची प्रक्रिया सुरु केली होती. नियुक्तीचं पत्र मिळाल्यानंतर कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करुन चोपडे वाराणसीला रवाना होणार आहेत.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online