Current Affairs 15 January 2018

NMK चालू घडामोडी – १५ जानेवारी २०१८ | Free Job Alert चालू घडामोडी – १५ जानेवारी २०१८, चालू घडामोडी – १५ जानेवारी २०१८ Updates | Current Affairs 15 January 2018

पंधरा वर्षांनंतर इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे भारतात आगमन – गळाभेट घेत मोदींनी केले स्वागत :
 • नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावर ते पोहोचले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी आणि नेतन्याहू विमानतळाहून तीन मूर्ती मार्गावरून पुढे रवाना झाले.
 • या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इस्रायलच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
 • दुपारी २.३० मिनिटांनी नेतन्याहू ताज हॉटेलमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
 • भारतातील आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान ते दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत. त्यांच्याबरोबर एक कार्यकारी शिष्टमंडळही भारतात येत आहे.
जागतिक उत्पादन निर्देशांकात भारत तिसाव्या क्रमांकावर :
 • जागतिक उत्पादन निर्देशांकात जागतिक आर्थिक मंचाने भारताला तिसावे स्थान दिले आहे. चीन पाचव्या क्रमांकावर आहे. ब्राझील, रशिया व दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स देश तुलनेने  खाली आहेत.
 • जपानचा पहिला क्रमांक असून जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रथमच उत्पादन सज्जता अहवाल जाहीर केला असून त्यात दक्षिण कोरिया, जर्मनी, स्वित्र्झलड, चीन, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, स्वीडन, ऑस्ट्रिया, आर्यलड हे देश पहिल्या दहात आहेत. ब्रिक्स देशांमध्ये रशिया ३५, ब्राझील ४१, दक्षिण आफ्रिका ४५ व्या क्रमांकावर आहे. भारताचा तिसावा क्रमांक लागला आहे.
 • या अहवालातील स्थान ठरवताना औद्योगिक धोरण, सामूहिक कृती हे निकष लावले असून शंभर देशांचे चार गटात वर्गीकरण केले आहे. त्यात अग्रमानांकित, उच्च क्षमताधारी, नव क्षमताधारी यांचा समावेश आहे. भारत हा वारसा गटात हंगेरी, मेक्सिको, फिलीपीन्स, रशिया, थायलंड, तुर्की यांच्यासमवेत आहे. चीन हा अग्रमानांकित देशात असून ब्राझील व दक्षिण आफ्रिका हे नवोदित देशात समाविष्ट आहेत.
 • अग्रमानांकित पंचवीस देशांची उत्पादन क्षेत्रातील स्थिती भक्कम असून हा अहवाल स्वित्र्झलडमधील दावोस येथे होणाऱ्या परिषदेच्या आधी जाहीर करण्यात आला आहे. कुठलाही देश चौथ्या औद्योगिक क्रांतीस सक्षम तयारी असलेल्या वर्गवारीत नाही. भारत हा जगातील पाचवा मोठा उत्पादनक्षम देश असून त्याचे उत्पादन मूल्य २०१६ मध्ये ४२० अब्ज डॉलर्स होते.
 • भारताचे उत्पादन क्षेत्र तीन दशकात ७ टक्क्य़ांनी वाढले असून त्यामुळे देशांतर्गत उत्पन्नात १६ ते २० टक्के भर पडली आहे. मानवी भांडवल व शाश्वत साधने ही भारतासाठी दोन महत्त्वाती क्षेत्रे आहेत.
‘पॅडमॅन’ अक्षयकुमार आज महिलांशी साधणार संवाद :
 • पुणे : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर जाण्यास सज्ज आहे. पॅडमॅन चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करताना दिसणार आहे. सध्या चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची प्रतीक्षा असून, अनेकांना चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे.
 • लोकमतने सखी मंच सभासदासाठी हा योग जुळून आणला असून, सोमवारी अक्षयकुमारसोबत त्यांना समोरासमोर संवाद साधता येणार आहे. या चित्रपटाचा ‘लोकमत’ मीडिया पार्टनर आहे.
 • सोमवारी दुपारी २ वाजता गेनबा सोपानराव मोझे प्रशाला येथे अक्षय कुमार ‘पॅडमन’ या चित्रपटाबद्दल दिलखुलास संवाद साधणार आहे. या वेळी यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. उषा काकडे व रोझरी ग्रुप आॅफ एज्युकेशनचे संचालक विनय आºहाणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उपस्थित सखींना त्यांच्या मनात असलेले सर्व प्रश्न अक्षयला विचारता येतील. या संवाद सत्रातून एका भाग्यवान विजेत्याला दस्तुरखुद्द अक्षयकुमारच्या हस्ते एक आकर्षक बक्षीसही जिंकण्याची संधी आहे.
 • अक्षय नेहमीच त्याच्या चाहत्यांमध्ये रमणे पसंत करतो. जेव्हा तो चाहत्यांसोबत असतो, तेव्हा स्टारपण विसरून त्यांच्यात मिसळतो. असाच काहीसा अनुभव या ठिकाणी येण्याची शक्यता आहे.
 • दरम्यान, सखी मंच सभासदांनाही अक्षयला भेटण्याची आतुरता आहे. दरम्यान, अक्षयकुमारचा पॅडमॅन हा चित्रपट अरुणाचल मुरुगनाथम यांच्या संघर्षमय कथेवर आधारित आहे. दुर्गम भागातील महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
अवघ्या अमेरिकेच्या काळजाचा ठोका चुकवणारा एक मेसेज… :
 • वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात क्षेपणास्त्र डागल्याचा मेसेज मोबाईलवर चुकून जारी झाला आणि एकच गोंधळ निर्माण झाला. अगदी सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. मात्र, काही वेळातच अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, चुकून अशाप्रकारचा मेसेज गेला आहे.
 • क्षेपणास्त्र डागल्याची केवळ अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्यांना मोबाईलवर त्यासंदर्भात मेसेज आला होता, त्यांच्या जीवात जीव आला.
 • स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी सर्व लोकांच्या मोबाईलवर एक आपत्कालीन मेसेज आला. त्यात म्हटले होते, “अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात बॅलिस्टिक मिसाईलची भीती आहे. तातडीने योग्य ठिकाणी आश्रय घ्या. ही कोणतीही ड्रील नाही.”
 • अशाप्रकारचा मेसेज मिळाल्यानंतर लोकांमध्येही भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर पुढील 10 मिनिटांनंतर हवाई आपत्कालीन यंत्रणेने ट्वीट करुन सांगितले की, “हवाई क्षेत्रात क्षेपणास्त्रांचा कोणताही धोका नाही.”
 • अमेरिकन लष्कराच्या हवाई विभागाने वेगळी सूचना जारी करत, क्षेपणास्त्रांसदर्भातील अलर्ट मेसेज चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकांच्या जीवात जीव आला.
नोक-या मागणारे नव्हे, तर देणारे बना – राष्ट्रपती रामनाथ कोविंद :
 • मुंबई : नोकरी मिळत नाही, म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये. प्रसंगी नोकरीतल्या संधी सोडेन, पण मी स्वत: नोकºया देणारा बनेन, स्वत:चा व्यवसाय उभारेन, अशी भावना असायला हवी. खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल, असे वातावरण तयार करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे यायला हवे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.
 • ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित आर्थिक जनतंत्र परिषद (इकॉनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह)च्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्यासह ठाणे, पालघर आणि मुंबईतील मुद्रा योजना, दलित व्हेन्चर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेले २०० यशस्वी उद्योजक उपस्थित होते. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही.
 • उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या संधींचा लाभ घेत नोकºया देणारे बना. वंचित, शोषित वर्गातील काही युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. ‘डिक्की’सारखी संस्था अशा तरुणांना मदतीचा हात देत आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
 • या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील आर्थिक व सामाजिक समानता लोकशाहीला अधिक बळकट करेल, असा विश्वास व्यक्त केला. युवाशक्ती ही देशाची ताकद आहे. कल्पकता व नवनिर्माणाची दृष्टी असणाºया या युवाशक्तीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्टार्टअप, मुद्रा, कौशल्य विकास यासारख्या योजना महत्त्वपूर्ण आहेत.
 • भारत युवा उद्योजकांचा देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी आभार मानले.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online