
मनोहर पर्रीकर दवाखान्यात व्याकूळ; तरीही काँग्रेसची सत्तेसाठी पळापळ
काँग्रेसच्या गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसचे प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार गोव्यात पोहोचले आहेत. काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.
काँग्रेसचे नेते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचेचे विधानसभेत तीन आमदार आहेत. काँग्रेसला केवळ सत्ता स्थापनेसाठी पाच आमदारांची आवश्यकता आहे. अन्य काही आमदारांच्या मदतीने काँग्रेस सत्ता स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अमित शहा सतर्क झाले होते, त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची राजधानी दिल्लीत बैठक घेतली आहे.