एका भाविकाने ‘लालबागचा राजा’ला दिली त्याचीच सोन्याची मूर्ती दान

परळमधील ‘लालबागाचा राजा’ गणपतीला दरवर्षी भाविक भरभरून दान देतात. यावर्षीही एका भाविकाने चक्क बाप्पाला त्याचीच सोन्याची प्रतिकृती दान केली आहे. ही सोन्याची मूर्ती भरीव असून तीची किंमत तब्बाल ४२ लाख रुपये इतकी आहे. तसंच मूर्तीच्या मुकुटात हिराही आहे. राजाच्या दर्शनासाठी भविकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे अवघ्या पाच दिवसात ‘लालबागचा राजा’च्या चरणी २ कोटी ६४ लाखांचं दान जमा झालं आहे.

‘लालबागचा राजा’ला अर्पण केलेली त्याची सोन्याची प्रतिकृती ही १ किलो २७१ ग्रॅमची आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती भरीव आहे. अतिशय आकर्षक अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या मुकुटात हिरा आहे. हा हिरा अंदाजे १ लाख रुपयांचा असल्याचं सांगण्यात येतंय.

You might also like
.
Comments
Loading...