
इंधन दरात पुन्हा भाववाढीचा भडका; परभणीत पेट्रोल ९१.३२ रुपयांवर
इंधन दरात आजही वाढ झाली. पेट्रोलच्या किंमतीत १० पैशांची तर डिझेलच्या दरात ९ पैशांची वाढ झाली. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलचा दर प्रति लिटर ७८ रुपये ४२ पैसे इतका आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परभणीत तर पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा आकडा पार केला असून लवकरच ते शंभर रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.